व्हाट्सअँप हे जगातील सर्वात जास्त वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर आहे. व्हाट्सअँप वर आपण विडिओ, फोटो, व टेक्स्ट मेसेज पाठवू शकतो. व्हाट्सअँप हे जगातले पहिले असे अँप आहे ज्यावर ads साठी जास्त वेळ थांबावे लागत नाहीं. व कमी डेटा चा वापर करून विडिओ व फोटो समोरच्या वक्ती पर्यंत पोहचवतो.
पण म्हणतात ना एखादी चांगली गोष्ट काही लोकांना सहन होत नाहीं, व्हाट्सअँप सोबत सुद्धा असंच चालू आहे.आपण व्हाट्सअँप अकाउंट बनवताना मोबाईल नंबर चा वापर करतो. पण तुम्हाला खबर आहे का या मोबाईल नंबर चा वापर करून हॅकर तुमचा व्हाट्सअँप
हॅक करू शकतो. आता पर्यंत लाखों लोकांचे व्हाट्सअँप अकाउंट हॅक झालेले आहेत. चला तर मित्रांनो जाणून घेऊया काय आहे व्हाट्सअँप हॅकिंग व हॅकर्स कसकाय पार पडतात ही कामगिरी. व आपण या फ्रॉड पासून कसे वाचू शकतो जाणून घेऊया.
या व्हाट्सअँप हॅकिंग ला आपण व्हाट्सअप हाईजॅकिंग सुद्धा म्हणू शकतो, जसे एखाद्या विमानाला हाईजॅक करतात तसेंच, पण कधी कधी ही हाईजॅकिंग जाणून बुजून नाहींतर आपोआप काही त्रुटीमुळेही होऊ शकते. व्हाट्सअँप अकाउंट हाईजॅक केल्यानंतर हॅकर तुमच्या व्हाट्सअँप मधील संदेश, विडिओ, फोटो सर्व काही पाहू शकतो, हॅकर हा तुमचा डेटा वाईट मार्गाने सुद्धा वापरू शकतो. व तुम्हाला ब्लॅकमेल सुद्धा करू शकतो.
कशी होऊ शकते व्हाट्सअँप हाईजॅकिंग :-
काही वेळेस असे होते कि आपण आपला मोबाईल नंबर खूप दिवस बंद करून ठेवतो, किंवा त्या सिम कार्ड ला खूप खूप दिवस रिचार्ज करत नाहीं त्यामुळे टेलिकॉम कंपनी आपला बंद नंबर एखाद्या दुसऱ्या कॉस्टमर ला देऊन टाकते. व तो कॉस्टमर जेव्हा नवीन व्हाट्सअँप अकाउंट उघडतो त्या वेळेस तुमच्या व्हाट्सअप चा संपूर्ण डेटा त्या दुसऱ्या व्यक्तीला दिसू लागतो.
अशा खूप घटना होऊन गेल्या :-
काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने नवे सिम कार्ड घेतले व त्यात व्हाट्सअँप अकाउंट उघडले. व्हाट्सअँप अकाउंट उघडल्यावर तो थक्क होऊन गेला कारण त्याच्या व्हाट्सअँप मध्ये अनोळखी ग्रुप्स व काही लोकांचे नंबर्स दिसून आले. त्याने लगेंच कॉस्टमर केअर ला फोन लावला. त्या नंतर त्या सिम ची विल्हेवाट लावण्यात आली.
अशी घ्या काळजी :-
अशी परिस्तिती होण्या अगोदरच आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात आपल्याला काही अडचण येणार नाहीं. त्या साठी सगळ्यांना या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
एक तर ज्या नंबर वर तुमचे व्हाट्सअँप अकाउंट आहे ते कधी बंदच पडू देऊ नका. आणि कदाचित कधी बंद पडण्याच्या मार्गांवर असल्यास लवकरच आपला नंबर अपडेट करून घ्या. व्हाट्सअँप अकाउंट नंबर अपडेट करण्याचे ऑपशन हे व्हाट्सअँप वर मिळून जाईल. नंबर अपडेट करताच तुमचा व्हाट्सअँप ला दुसरा नंबर ऍड होऊन जाईल.
मित्रांनो तुमच्या मोबाईल चे नाव कंमेंट मध्ये नक्की सांगा व तुम्हाला आमचा हा आर्टिकल कसा वाटला हे पण कंमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा.