आज महाराष्ट्रातील सर्व मराठी बांधवांसाठी व सर्व शिव सैनिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता औरंगाबाद चे छत्रपती संभाजीनर व उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्यात आले आहे. थेट केंद्रानी याची माहिती दिली आहे.या दोन शहरांचे नाव बदलण्याचे काम खूप दिवसांपासून चालू होते, जेव्हा ठाकरे सरकारच्या हातातून सत्ता जाणार होती त्या वेळेस उद्धव ठाकरे यांनी घाई घाईत औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबाद चे धाराशिव केले होते. पण याला काही लोकांनी विरोध केला व केंद्राकडूनही मंजूरी न मिळाल्यामुळे नाव बदलण्याचे काम राहून गेले. त्या नंतर लोकांनी विरोध प्रदर्शने केली पण याचा काही उपयोग झाला नाहीं.पण अचानक 24 फेब्रुवारी ला 4 वाजेच्या दरम्यान औरंगाबाद चे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबाद चे धाराशिव करण्याचा निर्णय अखेर केंद्रानी घेतलाच, देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून याची माहिती दिली व अमित शाह यांचे धन्यवाद केले.⚫️ छत्रपती संभाजीनगर, धाराशिवऔरंगाबाद चे नाव हे मुघल बादशाह औरंजेबाच्या नावावर ठेवण्यात आले होते, व उस्मानाबाद चे नाव हैद्राबाद रियासतीत असलेल्या एका शासकाच्या नावावर ठेवण्यात आले होते.छत्रपती संभाजीराजे हे शिवाजी महाराजांचे मोठे चिरंजीव होते व शिवाजी महाराजांनी बनवलेल्या मराठा सम्राज्याचे दुसरे राजे होते. 1689 साली औरंगजेबाने संभाजी महाराजांसोबत क्रूर व्यवहार करत फाशी ची शिक्षा दिली.धाराशिव हे उस्मानाबाद जवळील एका गुहेचे नाव आहे, तेथील लोकांच्या मते ही गुहा 800 वर्ष जुनी आहे. या दोन्हीही जिल्यांचे नाव बदल्यासाठी दोन्ही जिल्यातील लोकांकडून तीव्र आवाज उठवला जात होता, अखेर केंद्र सरकारच्या निर्णयानंतर दोन्ही जिल्यातील लोकांच्या मनातील आनंद गगनात मावत नाहीं हे.
आता औरंगाबाद नव्हे तर छत्रपती संभाजीनगर म्हणायचं 🚩...! अखेर औरंगाबादच संभाजीनगर व उस्मानाबादच धाराशिव झालेच, केंद्राची घोषणा
फेब्रुवारी २५, २०२३