शिवाजी महाराजांचा जन्म 16 फेब्रुवारी 1630 झाला. शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळाना हाती धरून स्वराज्याचा पाया भक्कम केला. हा पाया भक्कम करण्यासाठी त्यांना मावळासोबतच महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचाही सहभाग होता. या गड-किल्ल्यांवर शिवाजी महाराज व त्यांचे मावळे लहानपणी पासूनच असल्यामुळे त्यांना त्या गड-किल्ल्यांतील कानाकोपऱ्याची जाण होती.
आज आपण याच गड-किल्ल्यांपैकी काही सुरक्षित व भक्कम किल्ल्यांची माहिती घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रातील सर्वात भक्कम व सुरक्षित असलेले गड-किल्ले...
1) शिवनेरी किल्ला :-
शिवनेरी किल्ल्यावरच शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर गावात आहे. किल्ल्यावर शिवाई मातेचा मंदिर आहे, यांच्या नावावरच शिवाजी महाराजांचे नाव ठेवण्यात आले आहे. या किल्ल्यावर दोन पाण्याचे तलाव आहे. या तलावांना गंगा-यमुना या नावाने ओळखले जाते. शिवनेरी किल्ला हा सर्वात भक्कम किल्ला असून अधिक सुरक्षितेसाठी किल्ल्याच्या चारही बाजूनी खतरनाक दरी आहे. शिवनेरी किल्ल्यावर खूप अशा गुहा आहेत त्या बंद पडलेल्या आहेत, म्हटले जाते कि शिवाजी महाराज याच गुफेमध्ये शिवाजी महाराज गुरील्ला यूद्धाचा अभ्यास करायचे.
किल्ले प्रतापगड :-
महाराष्ट्रातील सातारा जिल्यात स्थित असलेला हा किल्ला भक्कम व युद्धस्थितीत सुरक्षित आहे. शिवाजी महाराजांनी नीरा नदी व कोयना नदीच्या सुरक्षेसाठी हा बनवला होता. 10 नोव्हेंबर 1656 ला शिवाजी महाराज व अफजल खाणाची भेट सुद्धा याच किल्ल्यावर झाली होती, व शिवाजी महाराजांनी अफजलखांनाला याच किल्ल्यावर चित केले होते.
अर्नाळा किल्ला :-
वसई गावात असलेला हा किल्ला सुंदर व भक्कम असा किल्ला आहे. चिमाजी अप्पाने या किल्ल्यावर कब्जा केला होता, या किल्ल्यासाठी खूप मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. हा किल्ला तिन्ही बाजूनी समुद्राने घेरलेला आहे.
लोहगडचा किल्ला :-
लोहगडचा किल्ला पुणे शहरापासून 52 किलोमीटर लांब लोणावळा येथे स्थित आहे.मराठा सम्राज्याची संपत्ती लोहगडावच ठेवली जात होती.
सिंधुदुर्गचा किल्ला :-
शिवाजी महाराजांनी हा किल्ला कोकण किनारपट्टीवर बांधला आहे. मुंबई पासून 440 किलोमीटर लांब सिंधुदुर्ग हा किल्ला आहे. या किल्याला बांधण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागला होता व हा किल्ला 48 एकरामध्ये पसरलेला आहे. या किल्ल्याचे दरवाजे खूप भक्कम आहे व सुरक्षित आहे. त्यासोबतच या किल्ल्याचे मनोहर दृश्य काळजाला भिडणारे आहे.