छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींना माहित आहे. शिवाजी महाराज हे थोर विचारवंत व पराक्रमी राजे होते. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा लोक एकता थकत नाही..
शिवाजी महाराजांनी बलासोबतच बुद्धीचा वापर करून स्वारज्याचा निर्माण केला. शिवरायांनी आपल्या बुद्धीने मुघलांना पायाची धूळ चाटायला लावली.
शिवाजी महाराजांनी माहित होते कि कपटी मुघल काय करील सांगता येत नाही. त्यासाठी शिवराय आधीच पूर्ण तयारीत राहायचे. असे खूप वेळा घडले कि शिवाजी महाराज हे मुघलांच्या कपटी चालीतुन बुद्धीचा वापर करून सुखरूप बाहेर पडले.
असाच एक शढयंत्र रचला होता अफजलखानाने. चला तर मग जाणून घेऊया अफजलखानाच्या या कपटीपणाबद्दल व शिवाजी महाराज या आव्हानाला कसे सामोरे गेले ते...
अफजलखान हा विजापूरच्या आदिलशाहीचा एक टाकतवाण योद्धा होता. अफजलखान हा कपटी व जिंकण्यासाठी काहीही करणारा आदिलशाही सैनिक होता. अफजलखानाला आदिलशाहाने मराठा सम्राज्यावर कब्जा करण्यासाठी पाठवले होते.
अफजलखाणाला माहित होते कि महाराष्ट्रवार हुकूमत करण्यासाठी आपल्याला शिवाजी ला संपवाले लागेल. पण त्याला या गोष्टीची जाण होती कि आपण जर समोरून लढायला गेलो तर शिवाजी महाराजांची चतुर सेना आपल्याला एक मिनिट पन टिकू देणार नाही.
अफजलखान हुशार होता त्याने शिवरायांना कपटीने मारण्याचा प्लान बनवला. त्याने शिवाजी महाराजांना भेटीसाठी पत्र लिहिले. शिवरायांनीही हे पत्र स्वीकारले व भेटीसाठी तैयार झाले. त्यांना माहित होते कि ह्या अफजल्या च्या डोक्यात नक्की काही न काही कपट असेल. शिवराय व अफजलखाणाची भेटीची जागा निश्चित झाली ते प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटणार होते. भेटीचा दिवस उगवला, भेटीला जायच्या आधी शिवाजी महाराजांनी सुरक्षिते साठी सुरक्षा कवच धारण केले. व आपत्कालीन स्थिती साठी हातात वाघनखें ठेवली. व अफजलखाणाला भेटण्यासाठी निघाले.
शिवाजी महाराज व अफजलखान आमने सामने आले, शिवाजी महाराजांनी अफजलखाणाला पाहताच त्यांना घाम फुटला. ते ताडासारखे उंच शरीर, हत्तीच्या पायासारखे हाथ, व एका उपाशी राक्षसासारखे तोंड. शिवराय व अफजलखान गळाभेट घेत असताना. अफजलखानाने शिवरायांना आपल्या जड हातानी दाबून धरले व पाठीत धारदार खंजीराने वार करू लागला. पण शिवरायांनी सुरक्षाकवच घातले असल्यामुळे ते बचावले.
अफजलखाणाची कपट समजताच शिवरायांनी आपल्या हातातील वाघनखाने त्याच्या पाठीत वार केला व एकाच वारात अफजलखानाचे आतडे बाहेर काढले. अफजलखान जागेवर मरून पडला.