छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातील शूर वीर व प्रतापी राजा होते, शिवाजी महाराजांचे उपकार महाराष्ट्रा सोबत संपूर्ण भारत कधीही विसरू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत मुघलांना पायाची धूळ चाटायला लावली. शिवाजी महाराजाचे साम्राज्य हे त्या काळचे सर्वात मोठे साम्राज्य होते.
शिवाजी महाराज हे शहाजी राजे व जिजाबाई यांचे मोठे पुत्र होते, शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याचा सहावा सम्राट औरंगजेबाला व संपूर्ण निजामशाहि सुलतानाच्या नाकात दम करून ठेवले होते, शिवाजी महाराजानी स्वराज्य प्राप्ती साथी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.
शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर झाला, त्या वेळेस पश्चिम भारतात तीन मुस्लिम सत्ता राज्य करीत होते, पहिले अहमदनगर येथील निजामशाही, दुसरी म्हणजे बीजापुर येथील आदिलशाही व तिसरी गोळकुंडा ची कुतुबशाही. या तिन्ही सत्ता वर्चस्वसाठी एकदुसऱ्यानसोबत लढत होती. या तिन्ही मुस्लिम सत्तेला न घाबरता शिवाजी राजांनी आपले अस्तित्व निर्माण केले व स्वतःहा राज्यअभिषेक करून छत्रपती बनले.
शिवाजी महाराजांचे संघर्ष :-
शिवाजी महाराजांनी 16 वर्षाचे असतानाच अस्त्र शस्त्र विद्या शिकून घेतली व किशोर वयातच मावळ्यांच्या मदतीने आस पासच्या किल्लावर कब्जा करण्यास सुरुवात केली, त्या वेळेस औरंगजेब हा सर्वात प्रसिद्ध व टाकतवर राजा होता.
शिवाजी महाराजांनी अफजलखानाला पराभूत केले. शिवाजी महाराजांचे पसरते साम्राज्य पाहून औरंगजेब घाबरून गेला व त्यांनी शिवाजी महाराजांना धोक्याने कैद केले. पण शिवाजी महाराज उक्तीने तेथून पळाले.
शिवाजी महाराज यांनी समुद्राची ताकत लक्षात घेऊन नौ दळाची स्थापना केली. शिवाजी महाराज हे कोणत्याही जाती धर्माच्या लोकांसोबत भेदभाव करत नसतं, त्यांच्या राज दरबारात सर्व जाती धर्माचे लोक काम करत असत.