इंडियन आर्मी मध्ये सिख रेजिमेंट आहे, मराठा रेजिमेंट आहे, महार रेजिमेंट आहे, गुरखा रेजिमेंट आहे, आणि अश्याच प्रकारच्या अनेक रेजिमेंट्स इंडियन आर्मी मध्ये आहे, पण आपण कधी विचार केलाय का, इंडियन आर्मी मध्ये मुस्लिम रेजिमेंट का नाही..?
बऱ्याच लोकांच्या मनात हा विचार येतो, पण याचे सटीक व सगळ्यांना समजण्याजोगे उत्तर लोकांना मिळत नाही. आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून आपल्याला याचं प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया इंडियन आर्मी मध्ये मुस्लिम रेजिमेंट नसल्याचे कारण..!
लोकांनी या गोष्टीवर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा उडवून ठेवल्या आहेत. काही लोकांच्या मते, 1965 पर्यंत मुस्लिम रेजिमेंट अस्तित्वात होती पण 1965 झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात मुस्लिम रेजिमेंटना पाकिस्तान विरोधात लढण्यात नकार दिला. त्यामुळे इंडियन आर्मीने मुस्लिम रेजिमेंटला भंग करून टाकले.
Legend मराठी ने केलेल्या सर्वे मध्ये हा दावा खोटा निघाला. आम्ही सर्वात अगोदर इंडियन आर्मी च्या सर्व ऑफिसिअल वेबसाईट बघितल्या. त्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रिजेमेंट दिसून आल्या मात्र मुस्लिम रेजिमेंट चे अवशेश कुठेही आढळून आले नाही. ्या सोबतच आमच्या टीमने राष्टीय व आंतरराष्ट्रीय न्यूस वेबसाईट चेक केल्या असता त्यातही मुस्लिम रेजिमेंट्स विषयी काहीही सापडले नाही.
खूप सापडल्यावर आमच्या टीम ला इंडियन आर्मीतील रिटायर्ड लेफ्टनंट जनरल सैय्यद अतां हसनैन यांचा लेख सापडला, हसनैन सध्या काश्मीर युनिवर्सिटीचे चान्सलर आहेत. त्यांच्या 'The 'missing' muslim regiment: Without compre sive rebuttal, Pakistani propaganda dupes the gullible across the board'. नावाच्या लेखात त्यांनी या विषयी पाकिस्तानातील इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन चा दुस्प्राचार सांगितलं आहे.
त्यांनी या लेखा मध्ये लिहिले आहे कि मुस्लिम रेजिमेंट ही पहिल्या पासून अस्तित्वातच नव्हती. पण ISPR ने या बद्दल खूप अफवा पसरवल्या.
जनरल सैय्यद यांनी या लेखात लिहिले आहे कि इंडियन आर्मी मध्ये मुस्लिम रेजिमेंट नसली तरीही वेगवेगळ्या रेजिमेंट मध्ये मुस्लिम सैनिक देशाची सेवा करीत आहे. व मुस्लिम सिनिकांनी ही देश सेवेसाठी आपल्या देहाचे बलिदान दिले आहे. जसे परमवीर चक्र ने सम्मानित केलेले अब्दुल हमीद, यांच्या सारखे खूप मुस्लिम बांधव आपल्याला सैन्य दलात रुजू झालेले दिसतील.
मित्रांनो, इंडियन आर्मीतील सर्व रेजिमेंट्स ब्रिटिश काळात तयार झालेल्या आहेत. ब्रिटिशांनी ह्या रेजिमेंट्स जाती धर्मा नुसार न बनवता क्षेत्रानुसार बनवल्या आहेत. काही रेजिमेंट्स जाती धर्मा नुसार आहे. त्याचे कारण त्या क्षेत्रात त्या धर्माचे लोक जास्त राहतात या मुळे..
आणि या मुळेच इंडियन आर्मी मध्ये मुस्लिम रेजिमेंट दिसून येत नाही.