शाळा, नाव घेताच डोळ्यासमोर एक सुंदरशी बिर्डिंग, शिक्षकवृंद, व मित्र मैत्रिणी आठवतात. तुम्ही जर जॉब किंवा कॉलेज मध्ये असाल तर तुमच्या मनामध्ये सुद्धा " वो दिन भी क्या दिन थे " हा डायलॉग नक्की येत असेल.
पण मित्रांनो आपल्याला माहित आहे का जगातील सर्वात मोठी शाळा कोठे आहे. व तिथे किती मुलं शिकतात. आज आम्ही आपल्याला ज्या शाळेविषयी माहिती सांगणार आहे, ती दुसरी कडे कुठे नसून आपल्या भारतातच आहे. या शाळेविषयी जाणून आपण नक्की थक्क होणार आहे. चला तर जाणून घेऊया या शाळे विषयी.
आपला भारत शिक्षण क्षेत्रात प्रगती करीत आहे. व जगामध्ये भारताचे नाव लौकिक करीत आहे. या सोबतच आपल्याला जाणून खूप आनंद होईल कि जगातील सर्वात मोठी शाळा ही भारतातच आहे. ही शाळा उत्तर प्रदेशातील लखनऊ जिल्ह्यात आहे. या शाळेचे नाव सिटी मोन्टेस्टरी स्कूल आहे. या शाळेला शॉर्ट फॉर्म मध्ये CMS सुद्धा म्हणतात.
या शाळेत वेगवेगळ्या कॅम्पस मध्ये 60 हजार पेक्षा जास्त विध्यार्थी शिकत आहेत. या मुलांना शिकायला 4500 पेक्षा जास्त शिक्षक आहेत. लखनऊ शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 20 कॅम्पस आहेत.
मित्रांनो आपल्याला ही माहिती जाणून कसे वाटले आम्हाला कंमेंट मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एक अशाच धमाकेदार लेखा सोबत...