मित्रानो आपण टीव्ही सिनेमा वर असे सीन नक्की बघितलेले असणार, ज्यामध्ये एक तांत्रिक एक विशिष्ट्य प्रकारची तुतारी वाजून सापाला आकर्षित करतो व त्या सापाला मृत पावलेल्या व्यक्तीच्या शरीरातल विष प्यायला लावतो आणि लगेच तो मृत पावलेला व्यक्ती जिवंत होतो.
अशीच एक घटना कानपुर येथील चौबेपूर तालुक्यातील गाजीपूर गावात दिसून आली आहे. या गावात काही दिवसांपासून एक तांत्रिक मृत महिलेला जिवंत करण्यासाठी तंत्र मंत्र करीत आहे. तंत्र मंत्र जादू टोणा या सारख्या गोष्टींवर काही लोक विश्वास ठेवतात तर काही याला निव्वळ अफवा समजतात. पण आपण कधी मृत व्यक्ती पुन्हा जिवंत करून दाखवण्याची गोष्ट कधी ऐकली आहे का ?..
घटना काय आहे ? :-
काही दिवसांपूर्वी या गाजीपूर गावातील एका महिलेने सापाला मारले होते. या नंतर दोन दिवसांनीच सापाने त्या महिलेला चावले व तिचा मृत्यू झाला. दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल, पण गावात एक नव्याच चर्चेला उधाण आल, कि त्या महिलेने सापाला मारल्या मुळे दुसऱ्या सांपाने बदला घेतला, गावातील लोकांनी एका बंगाली तांत्रिकाला तिथे बोलावले.
त्या तांत्रिकाने मृत महिलेच्या घरच्यांना विश्वास पटून दिला कि त्या सापाने आपल्या मेलेल्या सापाचा बदला घेतला आहे, मृत महिलेच्या घरच्याना विश्वास बसल्यावर त्या तांत्रिकाने तंत्र मंत्र म्हणन्यास सुरु केले.
त्या बंगाली तांत्रिकाने एका सात फूट खोल खड्डा करून त्या महिलेला ठेऊन व तिच्यावर काही कपड्यांनी टाकून दररोज त्या महिले जवळ बसून तंत्र मंत्र करीत आहे. आश्चर्य चकित करणारी गोष्ट म्हणजे रोज त्या महिलेच्या मृत शरीराजवळ जेवण ठेवण्यात येते.
मृत माहिलेच्या भावाने उठवला आवाज :-
मृत महिलेचा भाऊ जेव्हा तेथे पोहोचला व त्याला कळाले कि इथे काय चालू आहे, त्याने या अंधश्रद्धेचा विरोध केला, व मृत महिलेचा अंत्यसंस्कार करून टाकण्याची मागणी केली पण गावकर्यांनी त्याला तेथून हाकलून दिले.
येत्या पौर्णिमेला होणार पुन्हा जिवंत :-
गावकर्यांना v त्या तांत्रिकाला विचारण्यात आल्यावर ते म्हणाले कि या महिलेने एका नर सापाला दोन दिवसां पूर्वी मारले होते, त्याचाच बदला घेण्यासाठी मादा नागीण येऊन तिला डसली आहे.
तांत्रिक म्हणाला कि आम्ही तंत्र मंत्रणाचा वापर करून त्या नागीणला प्रसन्न करण्याचे काम करीत आहे व येत्या पौर्णिमेला ती या महिलेला पुन्हा जीवन दान देणार आहे, असे त्या तांत्रिकाचे म्हणणे आहे.
तर मित्रानो आपल्याला काय वाटते, कि तांत्रिक त्या मृत महिलेला तंत्र मंत्राच्या जोरावर जिवंत करू शकेन का नाही, आणि आज च्या या 5ग च्या युगात आश्या अंधश्रद्धाना मानने बरोबर आहे?.. आम्हाला कंमेंट मध्ये नक्की सांगा.